Sunday, March 25, 2012

कै ती श्रीमती रखमाबाई वासुदेव करमरकर , राहणार हुबळी यांनी तयार केलेली कै. श्री समर्थ भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचे चरणी प्रार्थना दि. २३-१०-१९७९

प्रभात समयी नभा शुभ रवि प्रभा फांकली ,
स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळेना कली
म्हणोनी कर जोडोनी करुं आंता गुरु प्रार्थना
समर्थ गुरु भाऊराया पुरवीं वासना ||१||
नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे |
हाचि निरोप गुरुंचा नामा परते न सत्य मानावे ||१||
नामांत रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे |
हाचि निरोप गुरुंचा भोगा संवे कुठे न गुंतावे ||२||
आनंदात असावे आळस भयं द्वेष दूर त्यागावे
हाचि निरोप गुरुंचा अनुसंधान कधी न चुकवावे ||३||
गोड सदा बोलावे नम्र पणे सर्व लोक प्रिय व्हावे |
हाचि निरोप गुरुंचा भक्तीने राघुपातीस आळवावे ||४||
स्वांतर शुद्ध असावे कपट आचरण स्वये न वश व्हावे |
हाचि निरोप गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे ||५||
मी रामाचा माझा राम सखा तो मी रामाचा दास नित्य बोलावे |
हाचि निरोप गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे ||६||
यत्न कसून करीन मी यश दे राम न दे तुझी सत्ता |
हाचि निरोप गुरुंचा मानावा राम सर्वदा कर्ता ||७||
आचार्य संयमाने युक्त असा नीति धर्म पाळावा |
हाचि निरोप गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावें ||८||
दाता राम सुखाचा संसार मान प्रभू सेवा |
हाचि निरोप गुरुंचा संतोष सर्वदा मनी ठेवा ||९||
स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा |
हाचि निरोप गुरुंचा मी पण जाळोनिया जगी वागा ||१०||
अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने |
हाचि निरोप गुरुंचा मारा तो नामाने ||११||
राज्या अधिकार येवो किंवा जाओ समस्त धन मान |
हाचि निरोप गुरुंचा भंगावेना कदा समाधान ||१२||
प्रेमात राम रमता प्रेमाला मोल ना जगामाजी |
हाचि निरोप गुरुंचा गुरु रायाला तहान प्रेमाची ||१३||
र. वा. करमरकर ( माई )इसवी सन १९७२

ध्यान मूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरो: पदम् |
मंत्र मूलं गुरोर्वाक्याम् मोक्ष मूलम् गुरो: कृपा ||

गुरुगीता