॥ जय महाराष्ट्र॥
शूर आम्ही सरदार आम्हांला काय कुणाची भीती
देव देस अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती...
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव देस अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती....
जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हांला ठावं
लढून मरावं मरून जगावं हेच आम्हांला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती
देव देस अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती...
शूर आम्ही सरदार आम्हांला काय कुणाची भीती...
No comments:
Post a Comment