श्रीनाथ स्तवन
येई येई येई येई माझ्या नाथराया ।
तुझ्या चरणकमलावरुनी कुरवंशली काया ॥
काय पूर्वपुण्यठेवा आजी फळा आला ।
परब्रह्म सद्गुरु माझ्या सदनासी आला ॥
भक्तकामकल्पद्रूम होसी दिनानाथा ।
नको पाहू गुण दोष तारी या अनाथा ॥
विठामाई माऊलीची धरियेली कास ।
म्हणुनी हा मार्ग झाला सुलभ आम्हास ॥
सद्गुरुदास परमानंदे चरणी ठेवी माथा ।
पुरवावा मनीचा हेत सख्या दिनानाथा ॥
(हे अत्यंत प्रेमपूर्ण व आर्तता असलेले नाथस्तवन श्री ॐ हरिनाथ गुरु दिनानाथ सेवेकरी (मा. हरिभाऊ, मु. पो. मुखेड, ता. येवला. जि. नासिक) यांनी श्रींच्या कृपेने तयार केलेले आहे. आपल्याकडे कोणत्याही आनंदमय उत्सवप्रसंगी, मंगलप्रसंगी उदा. श्रीगणेशाअगमन, गौरी आगमन, दसरा वगैरे आनंदमय प्रसंगी आपल्या सद्गुरुला आवाहन करण्याकरता अतिशय योग्य व प्रासादिक असे आहे. भाविकांनी यचा जरूर लाभ घ्यावा.)
No comments:
Post a Comment