श्रीराम
जयदेव जयदेव जयसद्गुरु माई।परिपूर्ण झालांत जीवनाठाई ॥धृ॥
जमखंडी ग्रामी कर्नाटक देशी
जन्म झालासे आपटे कुलवंशी
उमदीशानुग्रह तुम्हा लाभला बाल्यदशी
अखंड साधन योगे साधिले गुरुपदासी ॥१॥
सद्गुरु कृपेने तरला खडतर संसारी
नामामृत देऊन तारिले अनेक संसारी
एकोणिशे त्र्याऐंशी साली नरसिंह जयंतीसी
निजानंदी राहुनी पूर्ण केले अवतारासी ॥२॥
नित्य साधन करुनी तव शिष्यगण
आठवुनी तवस्वरूप होती उन्मन
सबीज नाम घेऊनी सद्भावांजली ही
अर्पियली दत्तात्रेय सद्गुरु चरणी ॥३॥
द्वारा - श्री दत्तात्रेय रामचंद्र फडके , पनवेल
No comments:
Post a Comment